रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची जाहिरात भोवली; या प्रसिद्ध कंपनीला सोळा लाखांचा दंड

जॉनसन एण्ड जॉनसन या प्रसिद्द कंपनीला ग्राहकांची दिशाभूल करणारी औषधे विकल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाला सोळा लाखांचा दंड द्यावा लागला आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढ करण्यासाठी संकेतस्थळावर दिलेल्या जाहिरातीप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला. गेल्या दीड वर्षांपासून या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने चौकशी करुन ग्राहकांना दिशाभूल करणारी जाहिरात संकेतस्थळावर दिल्याने आक्षेप नोंदवला होता.

काय आहे प्रकरण

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी जॉनसन एण्ड जॉनसन या कंपनीच्या संकेतस्थळावर रोगप्रतिकारकशक्ती वाढवणा-याचा दावा करणा-या चार उत्पादनांची जाहिरात पाहिली. ही चार उत्पादने जुलाब किंवा शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर डॉक्टरांकडून दिली जातात. नियमानुसार या औषधांची ऑनलाईन किंवा इतर माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे अशा स्वरुपाची जाहिरात करता येत नाही. द्रव स्वरुपातील चारही उत्पादनांच्या जाहिरातीप्रकरणी गेल्या वर्षी जुलै महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने चौकशी अधिकारी नेमून चौकशी सुरु केली. अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांनी ही चौकशी केली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी दोन महिन्यांपूर्वी दंडाधिकारी न्यायालयाने जॉनसन एण्ड जॉनसन कंपनीला सोळा लाख रुपयांचा दंड ठोठावला. कंपनीने दंड मान्य करत अन्न व औषध प्रशासनाला दंडाची रक्कम अदा केली.

उत्पादनांची नावे –

  • ओआरएसएल रिहायड्रेट
  • ओआरएसएल रेडी टू ड्रिंक इलेक्ट्रोलायट सोल्युशन
  • ओआरएसएल प्लस अ रेडी टू ड्रिंक इलेक्ट्रोलायट सोल्युशन
  • ओआरएसएल एफओएस अ रेडी ट्र ड्रिंक इलेक्ट्रोलायट सोल्युशन

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here