LED टीव्हीचा ब्लास्ट; 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

156

उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एलई़डी टीव्हीचा ब्लास्ट झाल्याने 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्या मुलाची आई आणि एक मित्र या ब्लास्टमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

LED टीव्हीमध्ये स्फोट झाल्याची ही घटना गाझियाबादच्या टीला मोड पोलीस स्टेशन परिसरातील हर्ष विहारमध्ये घडली. रहिवासी निरंजन यांचा 16 वर्षीय मुलगा करण हा त्याच्या मित्रासोबत घरात एलईडी टीव्हीवर कार्यक्रम पाहत होता. यादरम्यान, करणची आई ओमवतीही तेथे पोहोचली. अचानक एलईडी टीव्हीचा जोरात स्फोट झाला. तेथे उपस्थित असलेले तिघेही जखमी झाले. स्फोट इतका भयंकर होता की टीव्ही लावलेली भिंतही तुटली.

( हेही वाचा: शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात, जुने निष्ठावंत शिवसैनिक होणार अधोरेखित )

स्फोटमागील कारण अस्पष्ट

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तपास सुरु असून अद्याप टीव्ही च्या ब्लास्ट मागील कारण समजू शकलेले नाही. एलईडी टीव्हीचा स्फोट हाय व्होल्टेजमुळे झाल्याचा संशय आहे. या घटनेनंतर अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनीही घराची पाहणी केली.

अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी दिली माहिती

घरात इतर कोणतीही ज्वलनशील वस्तू नव्हती. घरातील एलईडी टेलिव्हिजन हे एकमेव उपकरण होते ज्याचा स्फोट झाला, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.