त्याची धावत्या ट्रेनखाली आत्महत्या…सुसाईड नोटमध्ये पंतप्रधानांना विनंती! 

मी एक चांगला डान्सर बनू शकलो नाही कारण माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला साथ दिली नाही, असे आत्महत्या केलेल्या तरूणाने म्हटले.

सध्याचा स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक युगात स्वप्नपूर्ती करणे जिकरीचे बनले आले, अशा वेळी एखाद्याला स्वप्नपूर्ती झाली नाही म्हणून नैराश्य येते आणि तो जीवन यात्रा संपवण्याचा चुकीचा मार्ग स्वीकारतो. असाच एक ग्वालियर येथील राहणाऱ्या तरुणाने त्याला चांगला डान्सर बनता आले नाही म्हणून त्याने धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली. मात्र त्याआधी सुसाईड नोट लिहिली. ज्यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.

का केली आत्महत्या? 

ग्वालियर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल परिसरातील ११ वीत शिकणाऱ्या युवकाने रविवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या युवकाच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट आढळली. ज्यात लिहिले होते की, मी एक चांगला डान्सर बनू शकलो नाही कारण माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला साथ दिली नाही.

(हेही वाचा : लग्न मंडपात चक्क देशी दारूचा कारखाना…बातमी वाचून थक्क व्हाल!)

काय म्हटले सुसाईड नोटमध्ये? 

आत्महत्येपूर्वी तरुणाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करण्यात आला आहे. अखेरची इच्छा पंतप्रधानांनी पूर्ण करावी, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. सुसाईड नोटमध्ये गायक अरिजीत सिंह द्वारा गायलेले गीत आणि नेपाळी कलाकार सुशांत खत्री यांनी कोरियाग्रोफ केलेला डान्सचा म्युझिक व्हिडीओ बनवला जावा, हा म्युझिक व्हिडीओ माझ्या आत्म्याला शांती देईल. सध्या या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील चौकशी सुरू आहे. परंतु केवळ चांगला डान्सर बनू शकलो नाही म्हणत आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या घरच्यांना त्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here