शहरात हजारो होर्डिंग असताना त्यातील २ हजार २०० पेक्षा होर्डिंग व्यावसायिकांनी २०१४ पासून शुल्क भरले नसल्याने, महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाने तब्बल १५९ कोटी १० लाख २२ हजार ८७९ रुपयांची वसूली काढली आहे. लेखापरीक्षण विभागाने ही रक्कम वसूल करण्यासाठी स्थायी समितीसमोर लेखापरीक्षण अहवाल सादर केला आहे.
…तर महापालिका दंड आकारते
पुणे शहराच्या सर्वच भागात होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे. त्यावर महापालिकेला नियंत्रण ठेवताना नाकी नऊ येत आहे. होर्डिंगची परवानगी घेतल्यानंतर, त्यासाठी महापालिकेचे प्रति मिटर २२२ रुपये इतके शुल्क भरावे लागते. तसेच दरवर्षी त्याचे नूतनीकरण करतानाही ही शुल्क आकारले जाते. जर वेळेत शुल्क भरले नाही, तर महापालिकेकडून पाच पट दंड आकारला जातो. महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाने आकाश चिन्ह विभागाकडील २०१४-१५ ते २०२०-२१ या वर्षातील प्रकरणांची तपासणी केली. त्यामध्ये आक्षेपार्ह बाबी व वसूलपात्र रक्कम दाखवण्यात आली आहे.
( हेही वाचा: आनंदाची बातमी! पुढील ४८ तासांत मान्सून धडकणार! )
Join Our WhatsApp Community