‘लालपरी’चा संप सुरूच! २४ तासांत एसटीच्या विलिनीकरणावर फैसला

133

एसटी महामंडळाचे विलिनीकरण राज्यशासनात करावे, यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नाही. संपकरी कर्मचारी वारंवार विनंती करूनही कामावर हजर होत नाही. तसेच राज्यभरात आजही बहुतांश एसटी कर्मचारी संपावर असल्याने एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. एसटीचे कर्मचारी संपावर असल्याने लालपरीची वाहतूक अद्याप सुरळीत सुरू झालेली नाही, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे दिसतेय. इतकेच नाही या संपाच्या काळात एसटीचे १,६०० कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडाले आहे. संपावर तोडगा काढण्यात एसटी महामंडळाला यश आलेले नसून, मंगळवार, २२ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष असून येत्या २४ तासांत एसटीच्या विलिनीकरणावर फैसला होणार आहे.

संपात एसटीचे १,६०० कोटींचे नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, विलिनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी सेवा बंद झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारातून खासगी बसगाडय़ा, शालेय बसेच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली. संप मिटत नसल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहे आणि एसटीचे नुकसान वाढतच गेल़े नोव्हेंबर २०२१ पर्यंत संपामुळे एसटीचे ४३९ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न बुडाले होते. त्यात आणखी वाढ झाली असून ते १ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचले आहे.

(हेही वाचा – लालू यादव दोषीच! न्यायालयाने सुनावली इतक्या वर्षांची शिक्षा)

खासगी संस्थेकडून वाहकांचीही नियुक्ती

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुन्हा कर्तव्यावर आलेल्या एसटी चालक, वाहकांकडून सेवा दिली जात आहे. त्याचबरोबरच खासगी चालकांकडून एसटी चालवली जात आहे. आता एका खासगी संस्थेकडून वाहकही नियुक्त केले जाणार आहेत. हे वाहक एसटी बसमध्ये सेवा न देता बस आगार, थांबे येथे उभे राहून प्रवाशांना तिकीट देणार असून लवकरच त्यांची नियुक्ती केली जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.