अनोळखी व्यक्तीने दिलेले चॉकलेट खाल्ल्याने नागपुरातील बर्डी परिसरातल्या मदन गोपाल हायस्कूलमधील १७ मुलांना विषबाधा झाल्याने त्यांना स्थानिक लता मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलांवर ताबडतोब प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्ष देशमुख यांनी दिली.
( हेही वाचा : …तर पोलीस पाकिटमारीचा गुन्हा दाखल करतील; जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण नाकारले )
१७ बालकांना विषबाधा
चॉकलेट खाऊन या मुलांना उलट्या व मळमळल्यासारखे वाटत होते. परंतु आता मुले स्थिर आहेत, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी सांगितले. या मुलांना शाळेच्या बाहेर एका अनोळखी व्यक्तीने चॉकलेट वाटल्याचे समोर आले आहे. चॉकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती बर्डी पोलिसांनी दिली आहे. कोणी वाढदिवशी वाटले की काही वेगळा हेतू होता या सर्व बाबी तपासानंतर उघड होईल, सध्या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यामातून सुद्धा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community