कोरोनावर उपचार करणारेच ‘कोरोना’च्या विळख्यात…

निवासी डॉक्टरांना कोरानाचा संसर्ग

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा फैलण्यास सुरूवात झाली आहे. मात्र धक्कादायक म्हणजे या कोरोनाच्या विळख्यात निवास डॉक्टर मोठ्या प्रमाणात सापडले आहे. राज्यभरात कोरोना, ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असून आरोग्य कर्मचारीही बाधित होण्याचे प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर उपचार करणारेच कोरोनाच्या विळख्यात आल्याने राज्याची चिंता वाढली आहे.

मुंबई परिसरातील सर्वाधिक निवासी डॉक्टर बाधित

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत राज्यातील १७० निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. चिंताजनक म्हणजे मुंबई परिसरातील सर्वाधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये जे.जे. रुग्णालयातील २८ निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा तर आतापर्यंत एकूण ५० जण कोरोनाग्रस्त आहे. यासह नायर रूग्णालयातील ३५ डॉक्टर कोरोनाबाधित तर केईएममध्ये ४०, जेजे रूग्णालयात ६१ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच ठाण्यात ८ डॉक्टर कोरोनाबाधित, कूपर रूग्णालयातील ७ आणि धुळ्यात ८ डॉक्टरांना कोरोना झाला आहे. पुण्यातील ससून रूग्णालयात ५, लातूरमध्ये ५ तर मिरजमध्ये एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे.

(हेही वाचा –पाणी जपून वापरा! कुर्ल्यात आज, उद्या पाणी कमी)

आतापर्यंत राज्यातील १७० डॉक्टर पॉझिटिव्ह

मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १७० निवासी डॉक्टर तिसऱ्या लाटेमध्ये आतापर्यंत बाधित झाल्याचे आढळले. सर्वाधिक बाधित डॉक्टर किंवा वैद्यकीय स्टाफ कोरोना बाधित होत असल्याने मनुष्यबळ कमी पडत आहेत. ही समस्या लक्षात घेता आरोग्य विभागाकडून जिल्ह्यांना असे अधिकार देण्यात आले की, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या विलगीकरणाचा कालावधी सात दिवसांवरून पाच दिवसांपर्यंत करण्यात यावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here