भारत-चीन सीमेवर काम करणारे BRO चे 18 कामगार बेपत्ता, एकाचा सापडला मृतदेह 

अरुणाचल प्रदेशातील भारत-चीनच्या सीमेवरील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) 19 कामगार मागील 13 दिवसांपासून बेपत्ता आहेत. यापैकी एका कामगाराचा मृतदेह कुमा नदीत आढळून आला. तर उर्वरित 18 कामगारांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही अशी माहिती कुरुंग कुमारी उपायुक्त निघी बेंगिया यांनी दिली.

बेपत्ता झालेले सर्व मजूर चीनच्या सीमेजवळ रस्ते बांधणीचे काम करतात. या कामगारांनी कंत्राटदारामार्फत ईदच्या सुट्टीसाठी अर्ज केला होता, परंतु त्याला परवानगी मिळाली नव्हती. या सर्वांना ईदनिमित्त आसाममधील त्यांच्या घरी जायचे होते. यासाठी त्यांनी ठेकेदाराकडे घरी जाण्यासाठी रजा मागितली होती, मात्र मागणी मान्य न झाल्याने ते सर्वजण पायीच आसामला रवाना झाले. तेव्हापासून हे सर्वजण बेपत्ता असून, यातील एका कामगाराचा मृतदेह कुमा नदीत आढळून आला आहे.

(हेही वाचा – …आणि कदमांना अश्रू अनावर, म्हणाले “50 वर्षात जे उभारलं ते पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळलं”)

या सर्वांना बीआरओने रस्ते बांधणीसाठी अरुणाचलमध्ये आणले होते, ईदच्या निमित्ताने ते आसाममधील त्यांच्या घरी जाणार होते. मजुरांना सोडण्यात यावे, असे कंत्राटदाराला अनेकवेळा सांगण्यात आले, मात्र कंत्राटदार न जुमानता हे सर्व मजूर पायी आसामला रवाना झाले.दरम्यान, सध्या अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असून, आगामी काही दिवसांतही येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हे सर्व कामगार नदी पार करत असताना बुडाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्वांसोबत नेमके काय घडले याबाबत कुठलीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here