आईपासून दूरावलेल्या बछड्याचे चोवीस तासांत मिलन

नाशिकमधील गवळाणे भागांतील शेतांत अवघ्या दोन दिवसांचा बिबट्याचा बछडा शेतात सापडला. वनविभाग आणि इकोएको या प्राणीप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी बछड्याची आणि आईची चोवीस तासांत भेट घडवून बछड्याचे प्राण वाचवले. लोकांनीही बछड्याबाबत तातडीने वनविभागाला कळवल्याने त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.

( हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला)

गुरुवारी सायंकाळी शेतात बिबट्याचा बछडा आढळल्याची माहिती लोकांनी वनविभागाला कळवली. वनाधिकारी तसेच इको-एको या प्राणीप्रेमी संस्थेने बिबट्याचा बछडा आढळून आलेल्या शेताला भेट दिली. डोळेही न उघडलेल्या तसेच पोटाची नाळही न तुटलेल्या बछड्याला आईपासून फार काळ दूर ठेवणे घातक ठरेल, म्हणून त्याच रात्री बछड्याचे आईसह मिलन करण्याचे ठरले. बछड्याला औषध आणि आहार दिल्यानंतर रात्री शेतात पुन्हा आणून ठेवले, मात्र आपल्या बछड्याला घ्यायला आई आली नाही. दुस-या दिवशी पुन्हा औषधोपचार आणि अन्न दिले गेले. सायंकाळी पुन्हा आईला भेटवण्याचा प्रयत्न झाला. यावेळी काही वेळांतच नजीकच्या भागांत दबा धरुन बसलेली बछड्याची आई आली आणि आपल्या त्याला घेऊन गेली. चोवीस तासांच्या आत बिबट्याच्या बछड्याचे आणि आईचे मिलन झाल्याने वनाधिकारी व स्वयंसेवकांचा जीव भांड्यात पडला.

पहिला प्रयत्न फसला कारण

गुरुवारी रात्री शेतात पाणी असल्याने बछड्याला नेण्यात मादी बिबट्याला अडचण आली असावी. जवळ अजून एक बछडा असल्याने त्याला सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी तिला दूरावलेल्या बछड्याचा शोध घेण्यास अडचण आली असावी, असा अंदाज इकोएको या प्राणीप्रेमी संस्थेचे अभिजीत महाले यांनी व्यक्त केला.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here