जम्मू-काश्मिरमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

155

दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरा येथे सोमवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी अवंतीपोरा येथील राजपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये त्रालचा रहिवासी असलेला शाहिद राथेर आणि शोपियानचा उमर युसूफ हे दोन जिहादी दहशतवादी ठार झाले आहेत. शाहिदचा अरिपाल येथील शकीला नावाच्या महिलेच्या आणि लुर्गम त्राल येथील सरकारी कर्मचारी जाविद अहमद यांच्या हत्येत सहभाग होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन ए.के. 47 रायफलसह गुन्हेगारी साहित्यही जप्त केले आहे. मारले गेलेले दहशतवादी लश्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे समजते. दरम्यान या परिसरात सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे.

( हेही वाचा: एलआयसीने आणली ही नवी योजना; जाणून घ्या अतिरिक्त लाभ देणा-या या योजनेविषयी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.