आर्थिक वर्षात बॅंकेमध्ये 20 लाख रुपये जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी किंवा चालू खाते उघडण्यासाठी पॅन किंवा आधार नंबरचा उल्लेख करणे अनिवार्य आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने बुधवारी काढलेल्या अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.
या अधिसूचनेनुसार, एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम बॅंकेतून अथवा पोस्टातील खात्यांतून काढताना किंवा बॅंकेत जमा करताना, तसेच ग्राहकाला बॅंकेत खाते उघडण्यासाठी पॅन आधार नमुद करणे बंधनकारक असणार आहे.
अहवाल द्यावा लागणार
बॅंक, पोस्ट ऑफीस आणि सहकारी संस्थांना एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या ठेवी आणि पैसे काढण्याच्या ग्राहकांच्या व्यवहारांचा अहवाल प्रत्यक्ष कर मंडळाला द्यावा लागेल.
( हेही वाचा: राजद्रोहाचा पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता माहित आहे का? )
…तर आधार नंबर नमूद करावा लागणार
बॅंकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढणे यासारख्या उच्च मुल्याचा व्यवहार करणा-या व्यक्तीकडे पॅन नसल्यास, त्या बदल्यात आधार क्रमांक नमूद करण्याची तरतूद 2019 सालच्या वित्तीय तरतुदींमध्ये करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community