देशविरोधी प्रचार करणाऱ्या २० पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी!

121

भारत सरकारने देशविरोधी प्रचार करणाऱ्या 20 यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. 20 डिसेंबर रोजी प्रथमच आयटी कायद्यात समाविष्ट नियमांचे पालन करून असे पाऊल उचलण्यात आले आहे. 20 यूट्यूब चॅनेलसह 2 वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. या चॅनेल्स आणि वेबसाईट्सवर देशविरोधी प्रचार आणि पाकिस्तानमधून काम केल्याचा आरोप आहे. आयटी कायदा 2021 अंतर्गत करण्यात आलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होते

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने हा अपप्रचार केला जात असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी नया पाकिस्तान नावाच्या वाहिनीचेही प्रसारण होत होते. त्याचे दोन लाखांहून अधिक सदस्य होते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या वाहिन्या काश्मीर, कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा विरोध आणि अयोध्यासारख्या मुद्द्यांवर चिथावणीखोर बातम्या चालवत आहेत.

( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कृतीशील अनुयायी प्रताप वेलकर यांचे निधन )

या वाहिन्यांवर बंदी 

भारताने बंदी घातलेल्या चॅनेलपैकी १५ चॅनेल हे नया पाकिस्तान ग्रुपच्या मालकीच्या आहेत, तर इतर चॅनेलमध्ये द नेकेड ट्रूथ, ४८ न्यूज आणि जुनैद हलीम अधिकारी यांचा समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अपूर्व चंद्रा यांनी यूट्यूब आणि दूरसंचार विभागाला पत्र लिहिले होते की, भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर परिणाम होत असल्याने हा मजकूर तात्काळ ब्लॉक करावा. यानुसार आयटी कायदा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.