मालवण बोट दुर्घटना : शिवसेना आमदाराच्या पुतण्याचा मृत्यू

147

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध मालवण पर्यटनास्थळाकडील तारकर्ली येथे समुद्र किनारी २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली. यात २ जणांनाच बुडून मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये अकोल्यातील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा पुतण्या आकाश देशमुख आणि स्वप्नील मारुती पिसे अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. याचा समावेश आहे. त्यामुळे या दुर्घटनेची मालवण येथे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या दुर्घटनेत दीड ते तीन वर्षांपर्यंतची तीन मुले पाण्यात फेकली गेली होती. या मुलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने मुलांचे प्राण वाचले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईला निघालेले मध्येच मालवणात दाखल झाले 

मंगळवारी, २४ मे २०२२ रोजी सकाळी मालवणमधील तारकर्ली येथे ही दुर्घटना घडली. या बोटीवर एकूण २० पर्यटक उपस्थित होते. या बोटीत दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात आकाश देशमुख याचा या बोट दुर्घटनेमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आकाशाच्या वडिलांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे. इंजिनियरिंग झाल्यानंतर आकाश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेचे छोटे मोठे कंत्राट घेऊन काम करत होता. आकाशाची आई, आकाश, विवाहित बहीण आणि भाऊजी अशी सगळी मंडळी अकोल्यातून पर्यटनासाठी मुंबईला निघाले होते. मुंबईला पोचल्यानंतर मध्ये त्यांचा प्लॅन बदलला आणि ते पर्यटनासाठी थेट मालवणात दाखल झाले होते.

(हेही वाचा काश्मीरच्या निसर्गसौंदर्याची पर्यटकांना भुरळ, तीन महिन्यांत साडेतीन लाख पर्यटकांनी दिली भेट)

स्कुबा डायविंगनंतर बोट उलटली 

मालवण फिरल्यानंतर आज सकाळी ते तारकर्ली येथे आले आणि त्यांच्या मनात स्कुबा डायव्हिंग करण्याची इच्छा निर्माण झाली. ही सगळी फॅमिली तारकर्ली किनाऱ्यावरून समुद्रात बोटीतून स्कुबा डायव्हिंगसाठी खोल समुद्रात गेली. स्कुबा डायव्हिग आटपून येत असताना वाऱ्याची एक झुळूक आली आणि आलेल्या प्रचंड लाटेत या बोटीने पलटी घेतली. या दुर्घटनेत आकाश देशमुखचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आकाशची आई,  बहिण आणि भाऊजी वाचले आहेत. आपल्या डोळ्यांदेखत झालेल्या आपल्या मुलाचा व भावाच्या मृत्यू हा आई आणि बहिणीला मनाला चटका लावून गेला आहे.

बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नावे 

रश्मी निशेल कासूल (४५, रा. ऐरोली, नवी मुंबई) आणि संतोष यशवंतराव (३८, रा. बोरिवली-मुंबई) या दोघा पर्यटकांना मालवण मध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृणाल मनीष यशवंतराव (वय ८, रा. बोरिवली-मुंबई), ग्रंथ मनीष यशवंतराव (वय दीड वर्ष, रा बोरिवली मुंबई) संतोष यशवंतराव (वय साडेचार वर्ष रा बोरीवली मुंबई), वैभव रामचंद्र सावंत (वय ४० वर्ष रा वायरी तारकर्ली), उदय भावे (वय ४०, रा. ऐरोली नवी मुंबई) या सर्वांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शुभम गजानन कोरगावकर (वय २२ रा केरवडे कुडाळ), शुभांगी गजानन कोरगावकर (वय २६, रा. केरवडे कुडाळ), लैलेश प्रदीप परब (वय ३२, रा कुडाळ), अश्विनी लैलेश परब (वय ३०, कुडाळ), मुग्धा मनीष यशवंतराव (वय ४० रा बोरिवली मुंबई), मनीष यशवंतराव (वय ४०, बोरिवली मुंबई) आयुक्ती यशवंतराव (वय ३१ रा. बोरीवली मुंबई) सुशांत आण्णासो धुमाळे (वय ३२ रा जयसिंगपूर कोल्हापूर), गीतांजली सुशांत धुमाळे (वय २८, जयसिंगपूर कोल्हापूर) प्रियन संदीप राडे (वय १४ रा. आनंद नगर पुणे) सुप्रिया मारुती पिसे (वय ३१, रा. पुणे) या सर्वांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.