धक्कादायक! मालवणजवळील तारकर्लीत २० पर्यटक असलेली बोट बुडाली

124

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणजवळ समुद्रात एक बोट बुडाली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मालवणमधील तारकर्ली येथे ही दुर्घटना घडली आहे. या बोटीवर एकूण 20 पर्यटक उपस्थित होते अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. बोट बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आले आहे. बोट नेमकी कशामुळे बुडाली आणि या दुर्घटनेमागचे नेमके कारण काय? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

‘जय गजानन’ नावाची ही बोट बुडाली 

घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. या दुर्घटनेत दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ‘जय गजानन’ नावाची ही बोट बुडाली आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मुंबई-पुण्यातील पर्यटकांचा समावेश आहे. स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना किनाऱ्यापासून काही अंतरावर बोट बुडाली. त्यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटमध्ये होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

(हेही वाचा पुण्यातील एक संशयित महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात; दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा केल्याचा आरोप)

यंदा पाऊस लवकर येणार आहे. १० दिवस आधीच मान्सून भारताच्या किनारी पोहचणार आहे. त्याचे वेध आधीच कोकणच्या किनारी लागले आहेत. त्यामुळे मागील आठवड्यापासून सिंधुदुर्ग, मालवण या भागातील काही समुद्र किनारे बंद करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.