देशातील फ्रन्ट लाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस (तिसरी लस) देण्यात आला. पण बूस्टरचा डोस घेतल्यानंतरही नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील सुमारे 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये डॉक्टरांपासून तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना समावेश आहे. यातील सारेच विलगीकरणात होते.
कोरोना लस घेण्याबाबत उदासीनता
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तिसऱ्या लाटेत मध्य भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधितांवर नागपूरच्या मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांसह (फ्रन्ट लाईन वर्कर) सह जेष्ठांसाठी लसीकरण सुरू झाले. मेडिकलमधील डॉक्टरांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंतमध्ये सुरूवातीला लस घेण्याबाबत उदासीनता होती. परंतु पुढे लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली.
(हेही वाचा – महापालिकेचा आदित्योदयाचा संकल्प : यंदा ४५,९४९ कोटींचा अर्थसंकल्प)
2200 कर्मचाऱ्यांनी बुस्टर घेतला त्यापैकी 200 बाधित
नागपुरातील मेडिकल आणि सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयामध्ये पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 6 हजारांवर होती. यापैकी 2200 कर्मचाऱ्यांनी बुस्टर डोस घेतला. यापैकी 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती माहिती पुढे आली आहे. बहुतांश अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सौम्य लक्षणे होती. तीव्र लक्षणे असलेल्यांपैकी निवडक अधिकारी, कर्मचारी वगळून इतर सगळ्यांवर गृह विलगिकरणात उपचार करण्यात आले.
Join Our WhatsApp Community