MSRTC: ग्रामीण समृद्धीची संजीवनी असलेल्या ‘लालपरी’ने आता कात टाकली!

124

पुण्यातील ग्रामीण समृद्धीची संजीवनी असलेल्या लालपरीने आता कात टाकली आहे. नव्या चित्तवेधक, आकर्षक रूपातील दोन हजार नव्या कोऱ्या एसटी बसेस आधुनिक सुविधांसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (MSRTC) तर्फे आगामी वर्षात प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होणार आहेत.

(हेही वाचा – MSRTC: शालेय शैक्षणिक सहलीसाठी एसटी महामंडळाच्या ‘लालपरीला’च पसंती)

जानेवारी महिन्यात रस्त्यावरील प्रवासाचा शुभारंभ होऊन एप्रिल महिन्याच्या अखेरीस सर्व बसेस रस्त्यावर येतील. कोरोना महामारीची खडतर दोन वर्षे आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप यामुळे आर्थिकदृष्ट्या आजारी पडलेल्या एसटीला या खाईतून बाहेर काढण्यासाठी काही महत्त्वपूर्ण व क्रांतिकारी बदल हाती घेतले असून, त्यातूनच पहिल्या टप्प्यात एसटी बसचा लुक बदलण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांत तिचे स्वरूप काहीसे बदलले असेल, पण मूळ लाल रंगाची ओळख तशीच ठेवली आहे. पहिल्या टप्प्यातील सातशे बसेसची बांधणी पुण्याच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेसह, औरंगाबाद व नागपूरच्या कार्यशाळेत युद्ध पातळीवर सुरू आहे. दापोडीच्या कार्यशाळेत तयार झालेल्या २५० वर बसेसच्या पासिंगसह परिवहन विभागाच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती, एसटीच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक द. गो. चिकोर्डे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.