आगामी 1 जानेवारी रोजी देशातील 10 कोटी शेतकऱ्यांना पीएम-किसान निधी योजनेचा दहावा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. यापूर्वी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी केलेया. त्यानुसार आगामी 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीं पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता हस्तांतरित करण्याची घोषणा करतील.
पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल,
1. पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.
2. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली फार्मर्स कॉर्नर असा ऑप्शन येईल.
3. फॉर्मर्स कॉर्नर मध्ये लाभार्थींची यादी या ऑप्शनवर जा.
4. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.
5. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.
(हेही वाचा – सरकारची 31st ला बंपर ऑफर! अवघ्या पाच रुपयांत व्हा टल्ली…)
तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर पैसै वर्ग
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी दोन हजार रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात.
Join Our WhatsApp Community