गोध्रा हत्याकांडातील आरोपी रफिकला जन्मठेप

२००२ मध्ये गोध्रा ट्रेनच्या डब्याला आग लावल्याचा आरोप असलेल्या रफिक हुसैनला गोध्रा सत्र न्यायालयाने शनिवारी, २ जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गोध्रा ट्रेनच्या डब्याला आग लावण्याचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर होता. आरोपी रफिक 19 वर्षांपासून फरार होता, पण अखेर गुजरात पोलिसांनी त्याला गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी अटक केली. गोध्रा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, त्याला अटक करण्यात आलेल्या घरावर छापा टाकण्यात आला.

ट्रेनच्या डब्याला आग लावण्याचा आरोप असलेल्या रफिक हा त्या गटाचा एक भाग होता. रफिकचाही या संपूर्ण कटात सहभाग होता, त्यानेच जमावाला भडकावले होते, ट्रेनच्या डब्यात पेट्रोल आणि आगीची व्यवस्थाही केली होती. या घटनेत त्याचे नाव समोर येताच तो तात्काळ दिल्लीला पळून गेला. त्याच्यावर हत्येचा आणि दंगल भडकवण्याचा खटला सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा शिवसेनेची ‘त्या’ ३९ आमदारांविरुद्ध याचिका दाखल)

काय घडला होता घटनाक्रम?

रफिकला फेब्रुवारी २०२१ मध्ये गोध्रा येथून पकडण्यात आले होते. 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेसमधून परतणाऱ्या 59 कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले. गुन्हेगारांनी प्रथम S-6 कोचमध्ये पेट्रोल शिंपडून पेटवून दिले. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगल उसळली आणि त्यात हजारो लोक मरण पावले. विशेष म्हणजे गोध्रा येथील सत्र न्यायाधीश एचपी मेहता यांनी शनिवारी रफिकला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रफिक हा या प्रकरणातील 35 वा दोषी असून त्याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मार्च 2011 मध्ये विशेष न्यायालयाने 31 आरोपींना दोषी ठरवले होते, तर 2018 मध्ये 2 आणि 019 आरोपींना दोषी ठरवले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here