Ahmedabad Bomb Blast: तब्बल 13 वर्षांनी न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल

130

 गुजरातमधील अहमदाबाद येथे 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणात एकूण 49 दोषी होते त्यापैकी 38 जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी 11 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 24 जुलै 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट 56 जणांचा मृत्यू झाला होता. हा निकाल अत्यंत महत्वाचा मानला जातोय. अहमदाबादमधील 2008 च्या साखळी बॉम्बस्फोटांचा खटल्याचा निकाल जलदरित्या लावण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने 49 पैकी 38 दोषींना UAPA आणि IPC 302 च्या अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

(हेही वाचा – शाळा, महाविद्यालयात सरसकट धार्मिक पेहरावास बंदी!)

मिळालेल्या माहितीनुसार, 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 56  जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर 2009 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. 8 फेब्रुवारी रोजी, विशेष न्यायाधीशांनी एकूण 77 आरोपींपैकी 49 आरोपींना भारतीय दंड संहितेच्या विविध गुन्ह्यांमध्ये, खून, देशद्रोह आणि राज्याविरुद्ध युद्ध पुकारणे, तसेच बेकायदेशीर प्रतिबंध या गुन्ह्याखाली दोषी घोषित केले होते.

9 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 9 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. ज्यामध्ये सहा हजार कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणीत आतापर्यंत 9 न्यायाधीश बदलले आहेत. त्याचबरोबर 1117 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.