- ऋजुता लुकतुके
मर्सिडिझ बेंझची जीएसएल एसयुव्ही रस्त्यावरून धावत असेल तर तिचा थाटच न्यारा असतो. एकावेळी ७ प्रवासी अगदी आरामात वाहून नेईल, इतका मोठा आकार आणि तितकीच मोठी ताकद तसंच देखणं इंटिरिअर यामुळे मर्सिडिझ कंपनीची ही लोकप्रिय एसयुव्ही होती. आता तिच्या फेसलिफ्टमध्येही कंपनीने अंमळ जास्तच आणि कलात्मकतेनं लक्ष घातलेलं दिसतंय. कारण, जगभरातील रिव्ह्यू वाचलेत तर जाणकार नव्याने या एसयुव्हीच्या प्रेमात पडलेले दिसतील.
फेसलिफ्ट केलेल्या कारच्या बाहेरच्या रुपात बरेच बदल करण्यात आले आहेत. गाडीचं आघाडीचं ग्रिल थोडं जास्त तगडं आणि त्यावरील कंपनीचा लोगोही थोडा मोठा म्हणजेच दणदणीत दिसेल असा करण्यात आला आहे. तर एलईडी दिव्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. तर गाडीचं इंटिरअरही पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. आतमध्ये ब्राऊन आणि काळी रंगसंगती आहे. आणि त्यात चंदेरी रंगही पेरण्यात आला आहे. आतून या गाडीचा लूक कंपनीच्या मेबॅक सीरिजसारखा राजेशाही आहे.
(हेही वाचा – Ind W vs Aus W 2nd T20 : भारतीय महिलांचा ६ गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाची मालिकेत १-१ अशी बरोबरी)
2024 MAYBACH GLS FACELIFT
📹: @danydrives (IG) pic.twitter.com/nG74jnTt4T
— Mercedes-Benz & Maybach Fans (@mbmaybachfans) December 23, 2023
गाडीतील इन्फोटेन्मेंट प्रणालीही आता बदलण्यात आली आहे. आणि अँड्रॉईड ऑटो तसंच ॲपल कारप्लेचं व्हर्जनही नवीन आणि वायरलेस आहे. गाडीतील सिट प्लस साईझ म्हणजे मोठ्या आहेत. तर चालकाजवळच्या डिस्प्लेवर ‘इनव्हिजिबल बॉनेट’ अशी एक आगळीवेगळी सुविधा आहे. यामुळे गाडीच्या खाली बसवलेल्या कॅमेराच्या मदतीने चालकाला गाडीच्या खालचा रस्ताही दिसू शकतो.
मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही सिटसमोर डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली आहे. अगदी तिसऱ्या रांगेत बसलेला प्रवासीही इथं आरामात बसू शकतो.
गाडीतील ३ सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन ३८१ अश्वशक्ती इतकी ताकद निर्माण करू शकते. तर गाडीची टॉर्क ५०० एनएम इतक्या क्षमतेची आहे. आणि अशा या राजेशाही गाडीची किंमत आहे जवळ जवळ १.४ कोटी रुपये.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community