नवी दिल्ली येथे जी २० ही जागतिक स्तरावरील परिषद होत आहे. (G-20 Summit) ही परिषद ज्या ठिकाणी होत आहे, ते भारत मंडपम भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवते. पाहूया भारत मंडपम आतून कसे आहे ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ ऑगस्ट रोजी भारत मंडपचे उदघाट्न केले होते. हे भारतातील सर्वांत मोठे कॉन्व्हेंशन सेंटर आहे. (G-20 Summit)
1 of 6

भारत मंडपम हे 123 एकरमध्ये पसरलेले आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 26 फुटबॉल स्टेडियम इतके आहे. ते ऑस्ट्रेलियातील सिडनी ऑपेरा हाऊसपेक्षा मोठे आहे

तिच्या भिंतींवर भारतीय संस्कृतीची चिन्हे कोरण्यात आली आहेत. योगमुद्रा, तंजावून पैंटिंग्स, मधुबनी आर्ट येथील भिंतींवर कोरण्यात आली आहे.

भारत मंडपमचे आर्किटेक्ट संजय सिंह सांगतात, ''भारत मंडपम भारताचा सांस्कृतिक वारसा आणि विविधता जगासमोर ठेवतो.''