आई आणि बाळं याचं नातं विश्वात निर्मळ मानलं जातं. मात्र नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो जाणून घेतल्यानंतर तुमच्या देखील पायाखालची जमीन हादरेल हे नक्की. अवघ्या 27 दिवसांच्या नवजात चिमुकल्याच्या रडण्याच्या त्रासाला वैतागलेल्या आईने टोकाचं पाऊल उचलले आहे. बाळाच्या रडण्याचा त्रास होत असल्याने जन्मदात्री आईने भिंतीवर डोकं आपटून अर्भकाचा जीव घेतला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना केरळ मधील असून या आरोपी आईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचा प्रिमॅच्युअर जन्म झाला असून हे बाळ सारखं आजारी असल्यामुळे रडायचं. यालाच वैतागून 21 वर्षीय आईने निष्पाप चिमुकल्या बाळाची हत्या केल्याचा आरोप आहे.
(हेही वाचा –ई-वाहनांना आता रेल्वेचा ‘आधार’!)
असा घडला प्रकार
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरूवारी घडली. या दिवशी बाळाला रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. पोलिसांनी सांगिलले की, डॉक्टरांनी तपास केल्यानंतर बाळाला परत घरी आणण्यात आले. मात्र त्यानंतर बाळाची तब्येत अधिकच बिघडली. त्यानंतर या बाळाला तालुक्यामधील एका रुग्णालयात नेण्यात आले मात्र दुर्दैवाने तिथे त्या बाळाचा मृत्यू झाला.
आश्रमात स्वयंपाकाचे काम करायची आई
21 वर्षीय तरुणी एका आश्रमात स्वयंपाकाचे काम करत होती. तिथे ती तिच्या 45 वर्षीय प्रियकरासोबत राहत होती. या आश्रमाला सांभाळणाऱ्या एका व्यक्तीच्या जबाबावरुन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या बाळाचे शुक्रवारी पोस्टमार्टम करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या डोक्याला जबर जखम असल्याचं पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांची चौकशी केली.
स्वतःच बाळाची हत्या केल्याचे केले कबूल
ही 21 वर्षीय तरूणी आधीपासून विवाहीत असलेल्या 45 वर्षीय पुरूषाच्या प्रेमात होती. हे तिला माहित होते, असे असतानाही ती या आश्रमात त्याच्या सोबत राहत होती, असे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले. धक्कादायक म्हणजे तरूणीने स्वतःच बाळाची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
Join Our WhatsApp Community