‘बेस्ट’च्या ताफ्यात २ हजार १०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार!

161

या वर्षभरात बेस्टच्या ताफ्यात २ हजार १०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत असा दावा ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लि. कंपनीने सोमवारी केला. बेस्टने त्यासाठी ३ हजार ६७५ कोटी रुपयांचा करार केला असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

( हेही वाचा : पावसाळ्यात घाट विभागांवर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वे २४ तास कार्यरत!)

६ रुपये भाडे

५ किमीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी एसी इलेक्ट्रिक बसच्या प्रवासासाठी ६ रुपये भाडे सध्या आकारले जाईल. यापूर्वी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑगस्टपासून जवळपास ९०० एसी डबल बसेस सुरू होतील अशी घोषणा केली होती. हैदराबाद ऑलेक्ट्रा ग्रीनटेकने हे कंत्राट मिळवले असून आम्ही वेळापत्रकानुसार ई-बस वितरित करू आणि मुंबईतील नागरिकांना प्रवासाचा उत्तम प्रवासाचा अनुभव देऊ असे ऑलेक्ट्र ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के.व्ही प्रदीप यांनी सांगितले.

संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असावी

मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासक राजवट सुरू झाली असून बेस्ट उपक्रमातही त्याच पद्धतीने कामकाज सुरू आहे. मुंबई पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेता आणि बेस्ट समितीतील सदस्य रवी राजा यांनी बेस्टकडून सेवेत बस दाखल होताना त्यातील संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तर बेस्ट समितीचे भाजपचे माजी सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्टकडून हा ताफा घेताना कोणाता निधी वापरला जाणार, त्याचे स्वरुप कसे असेल, गाड्या कुठे उभ्या असणार, गाड्यांची चार्जिंग व्यवस्था कशी असेल याची योग्य माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.