महसूलपाठोपाठ पोलीस विभागाची लाचखोरी सुरू असल्याचे एसीबीच्या कारवाईतून समोर आले आहे. गेल्या वर्षभरात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या २११ पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
लॉकडाऊनमुळे लाचखोरीला ब्रेक
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे लाचखोरीला ब्रेक लागला. मात्र, अनलॉकचा टप्पा सुरू होताच लाचखोरीमध्ये वाढ झाल्याचे एसीबीच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी लाचखोरीप्रकरणी राज्यात ७७३ गुह्यांची नोंद झाली. त्यामध्ये ७६४ सापळा रचून कारवाई केल्याचा समावेश आहे. २०२० च्या तुलनेत हा आकडा ११० ने जास्त आहे. मुंबई (५०), ठाणे (८९), पुणे (१६८), नाशिक (१२९), नागपूर (७२), अमरावती (७३), औरंगाबाद (१३०), नांदेड (६२), अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये एकूण १,०९९ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा – मतलबाचे ‘पाणी’ इथेच मुरतेय! शेलारांची पालिकेवर टीका)
वर्षभरात पोलिसांविरोधात १७३ जणांवर कारवाई
यामध्ये गेल्या वर्षभरात पोलिसांविरोधात १७३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर २०२० मध्ये हाच कारवाईचा आकडा १५४ होता. लाचखोरीच्या कारवाईनंतरही पोलीस दलातील अद्याप १२ पोलिसांवर अद्याप निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नसून ते आजही सेवेत असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community