पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांची दोन दिवसांनी सुखरूप सुटका

162

चंद्रपूर जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सूरू आहे. इरई धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले तर आता गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्या गेले. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ दोन दिवसापासून 22 वाहनधारक आपल्या ट्रक मध्येच अडकून पडले होते. दोन दिवसापासून पुरात अडकून असलेल्या या 22 वाहनधारकांना सूखरूप बाहेर काढण्यात गडचांदूर पोलिसांना यश आले आहे.

(हेही वाचा – गडचिरोलीतील 8 तालुक्यात पावसाचा कहर, अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला)

गडचांदूर पोलिसांना यश

वर्धा नदीचा प्रवाह सतत वाढत असल्याने वाहनचालक बाहेर पडू शकले नाहीत. पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच, गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाने वाहनचालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता.

वाहनचालकांनी मानले पोलिसांचे आभार

अखेर बुधवारी मध्यरात्री 2 वाजता पोलिसांनी सर्व वाहनचालकांना बाहेर काढण्यासाठी मुसळधार पावसात बोटीच्या साहाय्याने पाण्यात उतरले. सर्व वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीसांना यश आले. वाहनचालकात 6 स्थानीय तर 16 बाहेर राज्यातील होते. पोलीस प्रशासन जर वेळेत पोहचले नसते तर आम्ही सुखरूप बाहेर आलो नसतो, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी देत पोलिसांचे आभार मानले. गडचांदूर पोलिसांनी सर्व वाहनचालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.