गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित मागण्यासाठी सोमवारपासून राज्यातील तब्बल 22 हजार महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील कामकाजावर परिणाम झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 वरून 20 टक्के करावे, महसूल विभागात सहायकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमार्यादित पार पाडावी, नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4300 वरून 4600 रुपये करावा, 27 नव्या तालुक्यांत विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती करताना महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावी, प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे आणि पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-3 पदावर पदोन्नती द्यावी या मागण्यांसाठी आज राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूलच्या 22 हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
(हेही वाचा – माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल)
कोण होणार सहभागी?
दरम्यान, आजपासून राज्यातील तब्बल 22 हजार महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून या संपात नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, वाहन चालक, शिपाई आणि कोतवाल हे सर्व कर्मचारी सहभागी असणार आहेत.
कोणत्या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
- महसूल प्रशासनातील रिक्त पदांची तत्काळ भरती करावी
- अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून, दोन वर्षांपासून थांबलेली नायब तहसीलदार पदोन्नती करावी
- नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 वरून 20 टक्के करावे
- प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे
- पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-3 पदावर पदोन्नती द्यावी