मध्य रेल्वेत वर्षभरात २३.२० लाख विनातिकीट प्रवासी, किती महसूल झाला जमा?

1 एप्रिल ते 20 सप्टेंबर 2022 या कालावधीत मध्य रेल्वेने 154.57 कोटी रुपयांचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केला. विनातिकीट/अनियमित प्रवासातून मिळालेल्या महसुलापेक्षा गेल्या वर्षीच्या याच कालावधीत झालेल्या 65.58 कोटींपेक्षा ही 135.70 टक्के वाढ झाली आहे.

विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण 23.20 लाख प्रकरणे आढळून आली, मागील वर्षी याच कालावधीत 11.44 लाख प्रकरणे आढळली होती, त्यात 102.69 टक्के वाढ झाली आहे. 1 एप्रिल ते 20 सप्टेंबर 2022 या कालावधीत, केवळ तिकीट नसलेल्या प्रवाशांची एकूण 20.97 लाख प्रकरणे आढळून आली, मागील वर्षी याच कालावधीत 10.65 लाख प्रकरणे होती, त्यात 96.90 टक्के वाढ झाली आहे. अशा विनातिकीट प्रवाशांकडून 130.43 टक्के वाढ दर्शवून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (20.9.2022 पर्यंत) 144.50 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला, तर 2021-22 मध्ये (20.9.2021पर्यंत) 62.71 कोटी रुपये महसूल प्राप्त झाले होते.

(हेही वाचा ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश देण्यास विरोध)

विभागनिहाय प्रकरणे आणि महसूल खालीलप्रमाणे

  • मुंबई – 9.01 लाख प्रकरणे आणि 51.13 कोटी रु.
  • भुसावळ – ४.८९ लाख प्रकरणे आणि 38.58 कोटी रु.
  • नागपूर – 3.34 लाख प्रकरणे आणि 22.36 कोटी रु.
  • सोलापूर – २.७२ लाख प्रकरणे आणि 17.59 कोटी रु.
  • पुणे – 1.62 लाख प्रकरणे आणि 11.27 कोटी रु.
  • मुख्यालय – 1.61 लाख प्रकरणे आणि 13.64 कोटी रु.

प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here