कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 25 जण जागीच ठार

87

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झाला आहे. या अपघातात २५ हून अधिक भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून २० ते ३० जण जखमी झाले आहेत. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. नवरात्र निमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन हे सर्वजण कोरथा गावात परतत असताना हा अपघात झाला आहे.

(हेही वाचा – फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार! दोन क्लबचे समर्थक भिडले, 129 जणांचा बळी)

सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपये आणि जखमींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील ५० भाविक उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना वेगात असलेल्या ट्रॅक्टर उलटला आणि ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याने भरलेल्या शेतात पडली. त्यामुळे टॅक्टरमध्ये अडकलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना मदत करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत ट्विट करून घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.