‘बेस्ट’ झाले! तिसऱ्या लाटेत बाधित झालेले २५० कर्मचारी कोरोनामुक्त

121

महाराष्ट्रात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाने महाराष्ट्रात कहर केला होता. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग फैलू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनदरम्यान, मुंबईतील लाईफलाईन असणारी मुंबईची लोकल ठप्प होती. यावेळी एसटी महामंडळाच्या बसेस आणि महापालिकेच्या बसेस मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवत होत्या. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला होता. कोरोनाच्या तिनही लाटांचा सामना करत मुंबईकरांना बेस्ट सेवा देणाऱे संपूर्ण बेस्ट उपक्रम रविवारी कोरोनामुक्त झाले आहे.

250 कर्मचारी बरे होऊन पुन्हा सेवेत रूजू

मिळालेल्या माहितीनुसार, तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधित झालेले 250 कर्मचारी बरे होऊन पुन्हा सेवेत रूजू झाले आहेत. कोरोना संकटात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट सेवा सुरू होती. कोरोना काळात बेस्ट उपक्रमातील कर्मचारी दररोज जनतेच्या संपर्कात येत होते, त्यामुळे बेस्टचा वर्ग विशेषतः चालक आणि वाहक सर्वाधिक कर्मचारी कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – ‘स्वतःची झोप वाचवा!’ भाजप आमदाराचा राऊतांना इशारा)

बेस्ट प्रशासनातर्फे 27 बस आगारांमध्ये चाचणी शिबिर

कोरोना महामारीदरम्यान, बेस्ट उपक्रमातील तब्बल दोन हजार 912 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर दुसऱ्या लाटेदरम्यान, 752 कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले होते, आतापर्यंत 60 अधिकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना महामारीदरम्यान, 27 बस आगारांमध्ये कोरोना चाचणीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या लाटेवेळी 82 टक्के, दुसऱ्या लाटेत 15 टक्के तर तिसऱ्या लाटेत 3 टक्के कर्मचारी बाधित झाले होते. या काळात बेस्ट प्रशासनाने 27 बस आगारांमध्ये चाचणी शिबिर घेतले होते, त्यामुळे बाधित कर्मचाऱ्यांवर या शिबिराच्या माध्यमातून वेळीच उपचार करता येणं शक्य झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.