26/11…का ट्रेंड होत आहे ट्विटरवर ‘हिंदू टेरर’? 

75

२६/११ मध्ये मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये कसाबला समीर चौधरी नाव देऊन त्याच्या मनगटाला भगवा धागा बांधलेला होता. त्यामाध्यमातून हिंदू दहशतवाद ही संकल्पना रुजवण्याचे कारस्थान होते. मात्र सुदैवाने कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडल्यामुळे हा कट उधळला. मात्र त्यानंतरही या हल्ल्यामागे हिंदू दहशतवादच कारणीभूत होता, असे आरोप हिंदू विरोधी घटक करत आहेत, हा हिंदू विरोधी कट होता, अशा आशयाचा ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला आहे..

हिंदू नावाचे ओळखपत्र

२६/११ च्या हल्ल्यात हिंदू दहशहतवादाचे बीज रूजवण्याची पूर्ण तयारी पाकिस्तानने केली होती. हल्लेखोर दहशतवाद्यांकडे हिंदू नावांची ओळखपत्रे होती, याबाबत विश्लेषक अंशुल सक्सेना यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘२६/११ च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे हिंदू नावाचे ओळखपत्र होते. अजमल कसाबच्या मनगटाभोवती लाल धागा बांधून त्याला ‘समीर चौधरी’ असे नाव देण्यात आले. सर्व दहशतवादी मारले गेले असते तर योजना यशस्वी झाली असती. तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले नसते तर २६/११ ला हिंदू दहशतवादी हल्ला म्हटले गेले असते.’

हिंदू दहशतवाद निर्माण करण्याचा मोठा कट

जर कसाबचा मृत्यू किंवा तो पळून गेला असता तर, आजचे चित्र संपूर्ण वेगळे असते. हिंदू दहशतवादी प्रचार प्रस्थापित करण्यात शत्रूला यश मिळून या हल्ल्यासाठी हिंदूंना दोषी ठरवण्यात आले असते. हा भारताच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला होता आणि तो हिंदूंनी घडवून आणल्याचे सिद्ध करण्याचा मोठा कट होता. हा कट उद्ध्वस्त करण्यात तुकाराम ओंबळे सारख्या कर्तबगार पोलिसांमुळे आपल्याला यश आले.

( हेही वाचा : 26/11…मुंबईत दहशतवादाने पहिले पाऊल कधी टाकले? )

…तर आज आपण अंधारात असतो!

ट्विटरवर धन्यवाद तुकाराम ओंबळे, ट्रेंड होत आहे. ‘तुकाराम ओंबळे यांनी धाडस दाखवून कसाबला जिवंत पकडल्याबद्दल आणि सर्व शंका दूर केल्याबद्दल तुकाराम ओंबळे यांचे आभार’ अशा आशयाचे ट्विट अनेक युझर्सनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.