26/11…मुंबईत दहशतवादाने पहिले पाऊल कधी टाकले?

दिवाळी उलटून गेलेली, वातावरणात मुंबईकरांना कडाक्याच्या उन्हाळ्यापासून सोडवणारी…हवीहवीशी वाटणारी थंडी पडू लागलेली. टीव्हीवर क्रिकेटचा सामना सुरु होता. सचिन तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या फटकेबाजीमुळे भारत जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभा होता. थोडक्यात आनंदाचं वातावरण होतं. पण अशा वातावरणात मुंबईला हादरहून टाकणारी घटना घडली. वार बुधवार…आणि तारीख होती 26/11…वर्ष होतं 2008.

अशी होती ती काळरात्र

अचानक भयावह बातमी समोर आली, मुंबईतील ती रात्र काळरात्रीत बदलली होती. काही आतंकवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता, अंधाधूंद गोळीबार चालू होता. निष्पाप लोकांचे बळी जातं होते. हा सारा प्रकार अंगावर शहारे आणणारा होता. या हल्ल्याची सुरुवात कुलाब्यातल्या ताजमहल हॅाटेलपासून झाली. पाकिस्तानातून आलेले हे दहशतवादी ज्यांनी मुंबईला वेढा घातला होता. त्यांचा मुकाबला करताना मुंबई पोलिस दलाचे करकरे, कामटे, साळसकर आणि हवालदार तुकाराम ओंबळे हुतात्मा झाले. शेवटचा दहशतवादी मारला गेल्यानंतर मुंबईकरांनी सुस्कारा सोडला. मुंबईत झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतरही मुंबई जणू त्या काळरात्री काही घडलचं नाही, अशा पद्धतीने पुनश्च सुरळीत चालू झाली. पुन्हा एकदा मुंबई स्पीरीटची चर्चा सुरु झाली.

मुंबईत दहशतवादाचं पहिलं पाऊल 

पण, प्रश्न उभा राहतो की, मुंबईत दहशतवादानं पहिलं पाऊल टाकलं तरी कधी…6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पाडली गेली आणि तिथून सातशे-आठशे मैलांवर असलेल्या मुंबापुरीत हिंसक दंगली पेटल्या. 10-15 दिवसांनी त्या थांबल्या खऱ्या पण पुढच्याच महिन्यात म्हणजे 1993 मध्ये पुन्हा दंगली सुरु झाल्या. हा सूडाचा प्रवास होता. त्या दंगली भयावह आणि शेकडो निरपराध्यांचा बळी घेणाऱ्या होत्या. अखेर हिंसाचार थांबला…पण सूडाची आग काही शांत झाली नाही. त्याचाच परिणाम म्हणून, 12 मार्च 1993 रोजी मुंबईत साखळी बॅाम्बस्फोट घडवून आणले गेले. दहशतवाद्यांनी मुंबईत रोवलेलं ते पहिलं पाऊल होतं. 26/11 हे त्याच सूडाच्या प्रवासातील आणखी एक पाऊल होतं. मुंबईकरांच्या मनातील हे घावं अजूनही बुजलेले नाहीत…

 (हेही वाचा: लढण्याआधीच माघार! मुंबई विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here