देशात हिजाब प्रकरणी चांगलंच वातावरण तापलं आहे. अशातच बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील शिमोगामध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडला. हर्षा असे हत्या झालेल्या 26 वर्षीय कार्यकर्त्याचे नाव असून त्याच्यावर चाकूने वार करुन हल्ला करण्यात आला आहे.
(हेही वाचा – “राणे हे शिवसेनेचं प्रॉडक्ट, स्टंटबाजी, नौटंकी करणं हा राणेंचा जुना धंदा”)
Karnataka | A 26-year-old Bajrang Dal activist Harsha was allegedly murdered yesterday at around 9 pm in Shivamogga. Security heightened in the city.
— ANI (@ANI) February 20, 2022
असे सांगितले जात आहे की, हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. या हत्येनंतर शिमोगा जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. हिजाब विरोधी पोस्ट केल्याने त्याची हत्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. दरम्यान, शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहने भस्मसात करण्यात आली. घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले होते.
काय घडला नेमका प्रकार
रविवारी संध्याकाळी 26 वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती उघड झाली नाही. कर्नाटकातील हिजाब वादामुळे शिमोगा येथे सातत्याने आंदोलनं होत असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून काही काळ कलम 144 ही लागू करण्यात आले होते. अशा स्थितीत शिमोगा येथील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.