धक्कादायक! विदर्भात ९० दिवसांत २७९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे. यावर्षी ३१ मार्चपर्यंत म्हणजेच फक्त ९० दिवसांत तब्बल २७९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे असा धक्कादायक अहवाल अमरावती विभागीय उपायुक्तांनी शासनाला सादर झालेला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ८० शेतकऱ्यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळेना! )

मागील वर्षी १ हजार १७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा, जानेवारीत ८८, फेब्रुवारीत १०९ व मार्च महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी शासनाने काही योजना सुद्धा केल्या आहेत.

सन २००१ पासून १७ हजार ९३८ शेतकरी आत्महत्या

पश्चिम विदर्भात सन २००१ पासून महसूल विभागाकडे शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत तब्बल १७ हजार ९३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी फक्त ८ हजार १६६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आलेली आहे. तब्बल अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजेच ९ हजार ५३५ प्रकरणे शासन मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेली आहेत. २३७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

शेतकरी आत्महत्यांची जिल्हानिहाय स्थिती

पश्चिम विदर्भात यंदा मार्चअखेर २७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये ६० प्रकरणांत शासन मदत देण्यात आलेली आहे. ५५ प्रकरणे अपात्र, तर १६४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

  • अमरावती – ८०
  • अकोला – २९
  • यवतमाळ – ६९
  • बुलडाणा – ६१
  • वाशिम – ४०

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here