अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार ४८० नागरिकांचे स्थलांतर

140

राज्यात १ जूनपासून आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली आहेत. त्यांच्या सोयीसाठी ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून, १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी आपला जीव गमावला आहे, तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत:, तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

(हेही वाचा – तो डोंगर, ती झाडी, तेच आरे… मेट्रो कारशेड Ok होणार हाय!)

रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत अवजड वाहनांच्या एकेरी वाहतुकीसाठी सुरु राहणार असून, सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

गडचिरोलीत स्थिती आटोक्यात

गडचिरोली जिल्ह्यात सध्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. वैनगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून, नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एसडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे.

९५ महसूल मंडळांत अतिवृष्टी

  • – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच चंद्रपूर, वरोरा व भद्रावती येथील नागरीकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे.
  • – तसेच लष्कर, एनडीआरएफ एसडीआरएफ व स्थानिक पथकाच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
  • – वर्धा जिल्ह्यात जिल्ह्याची सद्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ११० महसूल मंडळापैकी ९५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.