कैद्यांना कोरोनानं घेरलं! आर्थर रोड तुरुंगातील २८ जणं बाधित

170

मुंबईतील सर्वात अधिक कैदी असलेल्या आर्थर रोड तुरुंगात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. मागील काही दिवसात २८ कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तुरुंग अधिकारी नितीन वायचळ यांनी दिली. या कैद्यामध्ये कोरोनाचे फारसे लक्षणे नसल्यामुळे चिंता करण्याचे कारण नसले तरी त्यांची काळजी घेतली जात असल्याची माहिती तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली आहे. बाहेरून येणाऱ्या ज्या कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे अशा कैद्यांना भायखळ्यातील एका मनपा रुग्णालयात विलगिकरण कक्षात ठेवण्यात येत असून तुरुंगात असलेल्या जुन्या कैद्यांना तुरुंगातील विलगिकरण कक्षात स्थलांतर करण्यात येत असल्याचे वायचळ यांनी सांगितले.

कैद्यामध्ये प्रसार होऊ नये सतर्कता

राज्यातील सर्वात अधिक कैदी असलेले मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात मागील काही दिवसात २८ कैद्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे, त्यात ४ कैदी हे तुरुंगातील जुने कैदी असून इतर कैदी हे बाहेरून आलेले नवीन न्यायबंदी असल्याची माहिती आर्थर रोड तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली. बाहेरून तुरुंगात नव्याने येणाऱ्या न्यायबंदीना तुरुंगात कोरोनाची चाचणी केली जात आहे, त्यात त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना भायखळ्यातील एका मनपा शाळेत विलगिकरनात पाठवण्यात येत असल्याची माहिती वायचळ यांनी दिली. तुरुंगात कैद्यासाठी वेगळे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले असून आतील कैद्यांना त्या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. पॉझिटिव्ह येणाऱ्या कैद्यामध्ये कोरोनाचे लक्षणे दिसून येत नसले तरी इतर कैद्यामध्ये प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत असल्याचे वायचळ यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – लोहगडाचा होतोय मलंगगड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई!)

कैद्यांवर कोरोनाचे उपचार सुरू

बाहेरून येणारे न्यायबंदी तसेच तारखेला न्यायालयात जाणारे तुरुंगातील कैदी यांना तुरुंगात येण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी केली जात असून त्यात अनेक जण पॉझिटिव्ह येत आहे, अशी माहिती वायचळ यांनी दिली आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कैद्यामध्ये चिंता करण्यासारखे लक्षण नसले तरी त्यांना योग्य ती वैद्यकीय सेवा दिली जात असल्याचे वायचळ यांनी सांगितले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.