‘तिला’ हॉटेलमध्ये जेवायला नेले आणि घात झाला!

104

लग्नाचे आमिष दाखवत तीन मित्रासह प्रियकराने बलात्कार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याप्रकरणी ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी प्रियकरासह चार जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार, धमकी देणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

पीडित महिला ही भिवंडी परिसरातील राहणारी आहे. काही वर्षांपूर्वी तिची ओळख गोविंद नावाच्या व्यक्तीसोबत झाली होती. या व्यक्तीने तिला लग्नाचे आमिष दाखवून २०१९ पासून ते १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वारंवार बलात्कार करीत होता, तसेच २०२० मध्ये काशीमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिचा प्रियकर एका हॉटेलवर जेवायला घेऊन गेला होता, त्यावेळी त्याने त्याच्या तीन मित्रांसोबत ओळख करून दिली. या तीन मित्रांनी देखील कारमध्येच तिच्यावर बळजबरीने सामूहिक बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने सोमवारी श्रीनगर पोलिस ठाण्यात केली होती. मात्र गुन्ह्याचे ठिकाण कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे श्रीनगर पोलिसांनी हा गुन्हा कासारवडवली पोलिसांकडे पाठवला.
दरम्यान आरोपीने पीडित महिलेकडून वारंवार लाखो रुपये उकळल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

(हेही वाचा : ट्विटरचा आता बांगलादेशातही हिंदुद्वेष!)

आरोपींचा शोध सुरू

याप्रकरणी पीडितेचा प्रियकर गोविंद आणि त्याचे तीन अनोळखी मित्राविरुद्ध सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.याप्रकरणी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे खैरनार यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.