Missile Misfired In Pokhran: पोखरण फील्ड फायर रेंजमध्ये सैन्याच्या तीन मिसाईल्सचे ‘मिस-फायर’

88

राजस्थानमधील सैन्याच्या पोखरण फील्ड फायर रेंज येथे युद्ध सरावादरम्यान डागन्यात आलेल्या तीन मिसाइल मिस फायर झाल्याची घटना घडली. दरम्यान, यातील दोन क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले आहेत तर तिसऱ्या क्षेपणास्त्राचा शोध सुरू आहे. लष्कराचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

पोखरण फील्ड रेंजमध्ये शुक्रवारी वार्षिक युद्ध सराव सुरू असतांना एका युनिटने डागलेले तीन मिसाइल मिस फायर झालेत. हे मिसाइल हवेत असतानाच त्यांचा स्फोट होऊन नष्ट झालेत आहेत. यापैकी दोन मिसाइलचे अवशेष परिसरातील शेतात कोसळले असून ते ताब्यात घेण्यात आले आहेत. या घटनेत सुदैवाने जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. परंतु, एका मिसाइलचे अवशेष सापडले नसून त्याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाइल हे सरावा दरम्यान डागण्यात आले होते. हे तिन्ही मिसाइल मिस फायर झालेत. तीन वेगवेगळ्या ठिकाणी याचे अवशेष कोसळले आहेत. सैन्य आणि स्थानिक पोलीस शोध मोहीम राबवत असून दोन मिसाइलचे अवशेष सापडले आहेत.

(हेही वाचा – जगासमोर हात पसरणारा पाकिस्तान सुखी आणि जगाला मदत करणारा भारत दुःखी कसा?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.