तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जवळपास १४ देशांच्या रेस्क्यू टीम तुर्कीमध्ये मदतकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. या दोन्ही देशांमधील मृतांची संख्या ७ हजार ७२६ च्या वर पोहोचली आहे. तर ४२२५९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढत असल्याने दोन्ही देशांमध्ये ३ महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. दरम्यान WHO ने तुर्की आणि सीरियामध्ये २० हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हाय अलर्ट जारी, ३ महिन्यांसाठी आणीबाणी लागू
या भूकंपामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी भारताने दोन विमानांद्वारे मदत साहित्य आणि वैद्यकीय पथक पाठवले आहे. यानंतर तुर्कीच्या राजदूतांनी भारताचे आभार मानले आहेत. तुर्कीमध्ये पहिल्यांदा ७.७ आणि त्यानंतर ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप धाला तेव्हापासून तुर्कीत जळपास ३०० हून अधिक हादरे बसले आहेत. अशी माहिती राजदूत फिरत सुनेल यांनी दिली आहे.
( हेही वाचा : तुर्कीनंतर आता पॅलेस्टाईनमध्ये भूकंपाचे धक्के! 4.8 रिश्टर स्केल तीव्रता)
भूकंप स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.१७ वाजता सुमारे १७.९ किमी खोलीवर झाला. यूएस जियोलॉजिकल सर्विसने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दक्षिण तुर्कीमधील गॅझियानटेपजवळ ७.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने अनेक इमारती कोसळल्या आहेत, ढिगाऱ्याखालील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असून तुर्कस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या भूकंपानंतर तुर्कीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावरून समोर येत आहेत.
Join Our WhatsApp Community