राज्यात एकीकडे महाराष्ट्र दिनाचा उत्साह आहे, वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर दुसरीकडे गडचिरोली (Gadchiroli) येथे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
(हेही वाचा – MD Drugs : पुण्यात 1.21 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त)
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली (Gadchiroli) येथील पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात ही चकमक झाली. यामध्ये पेरमीली दलम कमांडर कुख्यात नक्षलवादी बिटलू मडावीसह तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाला यश आले.
हेही पहा–
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या (Gadchiroli) आधारे रविवार ३० एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी ‘सी-६०’ पथकाने भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात अभियान राबवले होते. यावेळी दडून बसलेल्या नाक्षवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांकडूनही त्याला चोख उत्तर देण्यात आले. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या गोळीबार जरी थांबलेला असला तरीही चकमक झालेल्या ठिकाणी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Join Our WhatsApp Community