पुलवामामध्ये लष्कराला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये लष्कराला मोठे यश आलेआहे. सुरक्षा दलांनी येथे तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारले गेलेले तीन दहशतवादी पाकिस्तानी संघटना लष्कर-ए-तोयबा (LeT) शी संबंधित होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – पुण्यात इलेक्ट्रिक बसेससाठी अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन)

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे ठार झालेले तीन दहशतवादी स्थानिक असून ते लष्करशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेले तीन दहशतवादी स्थानिक होते आणि ते पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

तीन दहशतवादी ठार झाले

पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. ते पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. यातील एक दहशतवादी जुनैद शेरगोजरी असे असून तो जम्मू-काश्मीरचे विशेष पोलीस अधिकारी रियाझ अहमद ठोकर यांच्या हत्येमध्ये सहभागी होता. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या चकमकीत ठार झालेल्या अन्य दोन दहशतवाद्यांची नावं फाजील नजीर भट आणि इरफान अह मलिक अशी आहेत. हे पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून दोन एके 47 रायफल आणि एक पिस्तूल, दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here