जम्मू काश्मिरच्या उरी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा; पहाटेपासून गोळीबार सुरु

139

जम्मू- काश्मिरमधील उरी सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यांने खात्मा केला आहे. शुक्रवारी पहाटेपासूव लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये या परिसरात चकमक सुरु आहे. पाकिस्तानकडून घुसखोरी सुरुच आहे. त्यामुळे भारतीय जवानांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला असून, दहशतवाद्यांकडून वारंवार गोळीबार केला जात आहे. मागच्या काही दिवसांपासून जम्मू काश्मिरमध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले असून, दहशवाद्यांच्या कारवायाही वाढल्या आहेत. हे दहशतवादीदेखील सीमारेषा ओलांडून प्रवेश करत होते.

( हेही वाचा: मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार – मुख्यमंत्री )

तीन दहशतवादी ठार 

जम्मू काश्मिरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले आहेत. उरी सेक्टरमध्ये दहशतवादी घुसल्याचे, समजताच शोध मोहिम राबवण्यात आली. भारतीय सैन्यांकडून शोधमोहिम राबवल्याचे समजताच, दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबाराला सुरुवात केली. दहशतवाद्यांनी गोळीबार चालू करताच भारतीय सैन्यांनीही त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. त्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.