चीनची पाकिस्तानला धमकी; 300 अब्ज दिले नाहीत तर…

पाकिस्तान ज्याला आपला जवळचा मित्र म्हणवतो त्या चीनने आता पाकिस्तानला धमकी दिली आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. चीनकडून पाकिस्तानने करोडो रुपयांचे कर्ज घेतले आहे. आता याच कर्जापाई चीनने पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानने जर 300 अब्ज रुपये दिले नाहीत, तर आपण पाकिस्तानचा वीज पुरवठा बंद करु, अशी उघड धमकीच चिनी कंपन्यांनी पाकिस्तानला दिली आहे.

पाकिस्तान निरुत्तर

पाकिस्तानमध्ये 24 हून अधिक चिनी कंपन्या कार्यरत आहेत. या चिनी कंपन्यांची पाकिस्तानकडे तब्बल 300 अब्ज रुपांची थकबाकी आहे. ही थकबाकी जोपर्यंत दिली जात नाही, तोपर्यंत पाॅवर प्लॅन्ट बंद करु, असे कंपन्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील ऊर्जा, दळणवळण, रेल्वे आणि इतरही काही क्षेत्रांमध्ये या कंपन्यांचा मोठा दबदबा आहे. बैठकीत चिनी कंपन्यांनी थकबाकीवर सवाल उपस्थित केला. त्यावर पाकिस्तानकडे उत्तर नव्हते.

( हेही वाचा: आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान )

…तर वीज प्रकल्प बंद करणार

सध्या या चिनी वीज उत्पादक कंपन्यांच्या सुमारे 25 प्रतिनिधींनी अहसान इक्बाल यां मंत्र्याशी चर्चा केली. यावेळी या प्रतिनिधींची त्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी या चिनी कंपन्यांसोबत बैठक झाली. यावर लवकरात लवकर थकबाकी न  भरल्यास, आपण काही दिवसांत आलले वीज प्रकल्प बंद करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here