रेल्वे प्रकल्पातील रखडलेली कामे होणार सुसाट, ३०० कोटींची मंजूरी

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) अनेक प्रकल्पांना वेग मिळावा यासाठी राज्य सरकारने तब्बल ३०० कोटींची मंजुरी दिली आहे. यापूर्वी तीन वर्षांतील थकीत एक हजार कोटींपैकी फक्त १५० कोटी दिले आहेत. त्यानंतर गेल्या आठवड्या १५० कोटी पुन्हा देण्यात आले. आतापर्यंत एकूण ३०० कोटी रुपये राज्य सरकारने एमआरव्हीसीला दिल्याने रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रेल्वे प्रकल्पातील रखडलेली कामे होणार

दरम्यान, मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. त्यासाठी राज्य सरकार, रेल्वे मंत्रालय व जागतिक बँकेकडून संयुक्तरित्या निधी पुरवला जातो. पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील अनेक प्रकल्पांची कामे केली जातात. त्यापैकी सध्या काही कामे सुरू असून काही प्रकल्पांचे काम प्रस्तावित आहेत.

(हेही वाचा – शीना बोरा हत्याकांड प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाकडून इंद्राणी मुखर्जीला दिलासा)

निधी मिळवण्यास एमआरव्हीसी प्रयत्नशील

एमयूटीपी २ मध्ये सीएसएमटी ते कुर्ला पाचवा सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावा मार्ग, एमयूटीपी ३ मध्ये विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ एसी लोकल आदी ११ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा समावेश आहे. निधी मिळवण्यासाठी एमआरव्हीसी प्रयत्नशील होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here