‘#कैलेंडर _बदलें_संस्कृति_नही’ का होतंय ट्विटरवर ट्रेंड?

131

भारत देश आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. समाजात अलिकडे हळदी-कुंकू, लग्न समारंभ, सण- उत्सव या ऐवजी आता सर्वत्र किटी पार्ट्या, व्हॅलेंटाईन डे, रोज डे, रीबीन डे, साडी डे, फ्रेंडशीप डे साजरे होताना सर्वत्र दिसत आहे. या आचरणामुळे आपली मूळ हिंदू संस्कृती मागे पडत चालली आहे. एक मनोरंजन, हौस, मजा म्हणून आपण ३१ डिसेंबरला नवीन वर्षारंभाच्या स्वागतासाठी सज्ज राहतो आणि मध्यरात्री जल्लोषात काउंटडाऊन करत नववर्षाचे स्वागत करतो. परंतु भारतीय संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात ‘गुढीपाडवा’ या दिवशी साजरे केले जाते. याच पार्श्वभूमीवर आज ‘#कैलेंडर_बदलें_संस्कृति_नही’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

१ जानेवारी हे ख्रिस्ती नववर्ष

१ जानेवारी ख्रिस्ती नववर्ष असून केवळ दिनदर्शिका (Calendar) बदलते. या नववर्षानुसार भारतीय संस्कृतीमध्ये बदल होत नाही, हिंदु नववर्ष हे गुढीपाडव्यालाच साजरे केले जाते, अशा आशयाचे ट्विट ‘#कैलेंडर_बदलें_संस्कृति_नही’ या हॅशटॅग अंतर्गत व्हायरल होत आहेत. जगभरात बहुसंख्य ख्रिस्ती राष्ट्र असल्याने तसेच या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा हा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘1 जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा अपसमज निर्माण झाला आहे. परंतु जगाच्या आराखड्यावर (नकाशावर) आज अशी अनेक राष्ट्र आहेत, जी या पाश्चात्त्य संस्कृतीला झुगारून स्वराष्ट्राची संस्कृती जतन करत आहेत.

( हेही वाचा : मुंबईत किशोरवयीन मुलांचे लसीकरण ९ केंद्रात : १ जानेवारीपासून नोंदणी )

ट्विटर ट्रेंड 

एका ट्विटर युजरने इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अशा आशयाचे ट्विट केले आहे. तर, पाश्चिमात्य संस्कृतीला कोणताही आधार नसून केवळ त्यांच्याप्रमाणे कृती करण्यापेक्षा, भारतीय संस्कृतीचा अंगीकार करून त्याप्रमाणे आचरण करणे अधिक योग्य आहे. यासाठी भारतीय संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष साजरे करा! असे ट्विट व्हायरल होत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.