रेल्वेला चुकीच्या निर्णयाचा फटका, एक्सलेटरमुळे 32 लाखांचे नुकसान! नेमके काय आहे हे प्रकरण?

मध्य रेल्वे प्रशासनाला एका चुकीच्या निर्णयाचा फटका बसला असून विद्याविहार येथे ५ वर्षापूर्वी बांधण्यात आलेला ३२ लाखांचा एक्सलेटर नवीन रेल्वे ओव्हर पुलामुळे तोडण्यात येणार आहे.

( हेही वाचा : पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी; पाणपक्ष्यांना खुणावतेय सोलापूरातील उजनी धरणातील जैवविविधता )

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार विद्याविहार पश्चिम येथील एक्सलेटर 31 डिसेंबर 2016 रोजी बांधण्यात आले असून यावर 30 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. सदर एक्सलेटर तोडण्यासाठी रेल्वेकडून 2 लाख रुपये खर्च करण्यात येईल. अधिकांश वेळी बंद असलेल्या एक्सलेटर बाबत मध्य रेल्वेचे म्हणणे आहे की मशीनच्या खालच्या भागात पाणी घुसल्याने एक्सलेटर काही भाग क्षतिग्रस्त झाला असल्यामुळे काम करत नव्हता. पूर्व भागात 2 नवीन एक्सलेटर बसविले जाणार असून रेल्वे ओव्हर पुलासोबत एक्सलेटरचा कोणताही अवरोध नाही.

अनिल गलगली यांच्या मते सुरुवातीला गुणवत्ता राखली गेली नाही आणि प्रस्तावित ओव्हर पुलाचा विचार केला नाही. रेल्वे ओव्हर पुलाच्या बांधकामात अडथळा येत असल्याने एक्सलेटर तोडला जाणार असून तोडकामावर 2 लाखांचा खर्च करण्यात प्रस्तावित आहे आणि एक्सलेटर बांधणीवर 30 लाख खर्च करण्यात आले आहे. प्रस्तावित ओव्हर पुलाचे काम असतानाही एक्सलेटर बांधण्याची आवश्यकता काय होती? असा प्रश्न विचारत गलगली यांनी दावा केला आहे की, अधिकांश वेळी एक्सलेटर बंदच असायचा. यामुळे जनतेला काहीच सुविधा मिळाली नाही उलट 32 लाखांचा चुराडा झाला आहे. याबाबत चौकशी करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांच्या वेतनातून झालेला 32 लाखांचा खर्च वसूल करण्याची मागणी गलगली यांची आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here