Covid-19 नंतर चीनमध्ये ‘या’ नव्या व्हायरसचा धुमाकूळ; 35 जणांना लागण, कोणती आहेत लक्षणं?

गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ देशात कोरोनाने सर्वांना हैराण केले आहे. अद्याप कोरोनाचा संसर्ग देशातून पूर्णतः गेला नसताना आता आणखी एका नव्या व्हायरसची एन्ट्री झाली असल्याची माहिती मिळतेय. तैवानच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, चीनमध्ये झुनोटिक लानग्या व्हायरस (Zoonotic Langya Virus) आढळून आला आहे.

(हेही वाचा – नाशिकमध्ये पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू!)

आतापर्यंत झुनोटिक लानग्या व्हायरसने अनेकांना बाधित केले आहे. अहवालानुसार, आतापर्यंत ३५ जणांना या नव्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. या नव्या व्हायरसला लानग्या हेनिपाव्हायरस असेही म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी चीनचा शेडोंग प्रांत आणि मध्ये हेनान प्रांतात लानग्या हेनिपाव्हायरसची लागण झालेले रूग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी न्यक्लिक अॅसिड चाचणी पद्धतीचा वापर केला जाणार आहे.

 प्राण्यांपासून नव्या व्हायरसचा संसर्ग?

असेही सांगितले जात आहे की, हा नवा व्हायरस प्राण्यांपासून पसरत आहे, ज्याला लानग्या हेनिपाव्हायरस लेव्ही असे म्हटले जाते. हा व्हायरस प्राण्यांच्या संपर्कात आल्याने माणसांना बाधित करू शकतो. चीन आणि सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, या व्हायरसने आतापर्यंत दोन्ही प्रांतांमधील तब्बल ३५ जणांना लागण झाली आहे.

नव्या व्हायरसची ही लक्षणं

जेव्हा या व्हायरसचा संसर्ग होतो, तेव्हा लोकांमध्ये ताप, थकवा, खोकला आणि मळमळ यांसारखी लक्षणे जाणवू लागतात. शेडोंग आणि हेनान प्रांतांमध्ये, लानग्या हेनिपाव्हायरस संसर्गाच्या ३५ पैकी २६ प्रकरणांमध्ये ताप, चिडचिड, खोकला, मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे आढळून आली असल्याचे सांगितली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here