मुंबई पोलिस दलातील ३७० पोलिस सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर!

या अधिकारी आणि अंमलदारांच्या सेवानिवृत्ती नंतर मुंबई पोलिस दलात एक पोकळी निर्माण होणार आहे.

मुंबई पोलिस दलातील ३७० पोलिस अधिकारी आणि अंमलदार मे महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. या सेवानिवृत्ती मध्ये ९ सहाय्यक पोलिस आयुक्तांसह ३ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. या सेवानिवृत्ती नंतर मुंबई पोलिस दलात मोठी पोकळी निर्माण होणार आहे.

यंदाच्या वर्षी मोठी यादी

मुंबई पोलिस दलात प्रत्येक वर्षी सेवानिवृत्तीची यादी जाहीर करण्यात येते. यावर्षी देखील ही यादी जाहीर करण्यात आली असली, तरी प्रत्येक वर्षापेक्षा यंदाची सेवानिवृत्तीची यादी मोठी आहे. ३१ मे २०२१ रोजी म्हणजे या महिन्याच्या अखेरीस मुंबई पोलिस दलातून ३७० पोलिस अधिकारी आणि अंमलदार सेवानिवृत्त होत आहेत. या सेवानिवृत्ती मध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (जमादार) आणि पोलिस अंमलदारांचा समावेश आहे.

(हेही वाचाः आता कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणार पोलिस दलातील ‘सुपर सेव्हर्स’!)

लवकरच पोकळी भरुन काढणार

सहाय्यक पोलिस आयुक्त पंढरीनाथ व्हावळ(गुन्हे शाखा), भीमराव इंदलकर(माटुंगा विभाग), विजय धोपावकर(माहिम विभाग), विलास कानडे(विक्रोळी विभाग), कुंडलिक निगडे(घाटकोपर विभाग) यांच्यासह ४ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ७ पोलिस निरीक्षक, सुमारे ३५ पोलिस निरीक्षक यांचा समावेश आहे. हे अधिकारी आणि अंमलदार पोलिस दलातून या महिना अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. या अधिकारी आणि अंमलदारांच्या सेवानिवृत्ती नंतर मुंबई पोलिस दलात एक पोकळी निर्माण होणार असून, लवकरच ही निर्माण झालेली पोकळी भरण्यात येईल, असे एका जेष्ठ अधिका-यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here