भायखळा तुरुंगातील ३९ महिला कैदी कोरोनाबाधित… ‘या’ प्रकरणातील आरोपीलाही झाला कोरोना!

या पाठोपाठ मुंबईतील आर्थर रोड, ठाणे, कल्याण, येरवडा आणि कोल्हापूर तुरुंगात कोरोनाबाधित कैद्यांची संख्या वाढली आहे.

राज्यातील तुरुंगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून भायखळा येथील महिला तुरुंगात, ३९ महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात शीना बोरा प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी यांचा समावेश आहे. या महिला कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या पाठोपाठ मुंबईतील आर्थर रोड, ठाणे, कल्याण, येरवडा आणि कोल्हापूर तुरुंगात कोरोनाबाधित कैद्यांची संख्या वाढली आहे.

महिला कैदी विलगीकरण कक्षात

भायखळा महिला तुरुंगात असलेल्या महिला कैद्यांपैकी ५३३ कैदी महिलांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी ४१ महिला कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी २ महिला कैदी ब-या झाल्या असून, ३९ कैदी अद्याप ही कोरोनाबाधित आहेत. याबाधित कैद्यांमध्ये शीना बोरा प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला देखील कोरोनाची लागण झालेली आहे. या कोरोनाबाधित कैद्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती, तुरुंग अधिकारी यांनी दिली.

(हेही वाचाः कोरोना जेलमध्येही शिरला… १५ जणांचा मृत्यू!)

राज्यातील तुरुंगात अशी आहे रुग्णसंख्या

राज्यात लहान मोठे असे एकूण ४७ तुरुंग आहेत. या तुरुंगात सध्या ३४ हजार ९४३ कच्चे आणि शिक्षा झालेले कैदी आहेत. सर्वात अधिक कैद्यांची संख्या आर्थर रोड, ठाणे, तळोजा, आधारवाडी आणि येरवडा या तुरुंगांत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तुरुंगातील कैदी देखील मोठ्या प्रमाणात संक्रमित होत आहेत.

कुठे किती कैदी कोरोनाबाधित?

आर्थर रोडः

एकूण चाचण्या- ५०७७

पॉझिटिव्ह कैदी- २८३

बरे झालेले कैदी- २६१

उपचार घेणारे कैदी- २२

ठाणे मध्यवर्ती कारागृहः

एकूण चाचण्या- ३४५३

पॉझिटिव्ह कैदी- ६३

बरे झालेले कैदी- ३८

उपचार घेणारे कैदी- २५

तळोजाः

एकूण चाचण्या- ५८६५

पॉझिटिव्ह कैदी-

बरे झालेले कैदी-

मृत्यू-

भायखळा जिल्हा तुरुंगः

एकूण चाचण्या- ९२

पॉझिटिव्ह कैदी-००

भायखळा महिला कारागृहः

एकूण चाचण्या- ५३३

पॉझिटिव्ह कैदी- ४१

बरे झालेले कैदी-

उपचार घेणारे कैदी- ३९

कल्याण आधारवाडीः

एकूण चाचण्या- ५५९७

पॉझिटिव्ह कैदी- ९१

बरे झालेले कैदी- ६०

उपचार घेणारे कैदी- ३१

येरवडाः

एकूण चाचण्या- ८०१९

पॉझिटिव्ह कैदी- ४५१

बरे झालेले कैदी- ४१४

मृत्यू-

उपचार घेणारे कैदी- ३५

कोल्हापूर जिल्हाः

एकूण चाचण्या- ११२०

पॉझिटिव्ह कैदी- ५६

बरे झालेले कैदी- २८

उपचार घेणारे कैदी- २८

नाशिकः

एकूण चाचण्या- ३४६०

पॉझिटिव्ह कैदी- ६४

बरे झालेले कैदी- ४९

उपचार घेणारे कैदी- १५

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here