दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमधील लासबेला जिल्ह्यातील बेला भागात प्रवासी बस रस्त्यावरून खाली दरीत कोसळली. रविवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात ३९ जणांचा मृत्यू झाला असून, चौघे जण जखमी असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, बस वेगात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. गाडी दरीत पडल्यानंतर बसला आग लागली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य सुरू आहे. बेलाच्या सहाय्यक आयुक्तांनी सांगितलं की, क्वेटाहून बलुचिस्तानची राजधानी कराचीला जाणारी बस खोल दरीत कोसळली. त्यामुळे गाडीला मोठी आग लागली. बसमध्ये ४८ प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना लासबेला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
( हेही वाचा: अभिमानास्पद! भारतातील तरुणांच्या आत्महत्या प्रतिबंध राष्ट्रीय सल्लागार परिषदेत महाराष्ट्राच्या तरुणाची निवड )
Join Our WhatsApp Community