पॉझिटिव्ह बातमी! राज्यात नव्या कोरोना रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

मुंबईतूनही येत्या दोन आठवड्यांत तिसरी लाट संपणार?

149

गेले आठवडाभर कोरोच्या नव्या नोंदणीमुळे आरोग्यक्षेत्रासमोर नवे आव्हान उभे राहत असताना बुधवारी कित्येक दिवसांनी कोरोना रुग्णांची डिस्चार्ज संख्या जास्त दिसून आली. बुधवारी ३९ हजार ८५७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर नव्या नोंदीत केवळ ३५ हजार ७५६ रुग्णांची नोंद झाली. आता कोरोनाची लाट मुंबई या महानगरतून इतर महानगरांत आढळत असली तरीही पंधरवड्यात मुंबईतून तिसरी लाट हद्दपार होईल, अशी आशा आरोग्य विभागातील अधिका-यांनी व्यक्त केली.

सक्रीय रुग्णांच्या संख्येत पहिल्यांदाच घट

बुधवारी पुण्यातही कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत सकारात्मक चित्र आढळले. सक्रीय रुग्णांच्या संख्येत पहिल्यांदाच घट नोंदवली गेल्याचे आरोग्य विभागाच्या नोंदीत आढळले. मंगळवारी पुण्यात ९३ हजार ६४२ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु होते. बुधवारी ९२ हजार ९७३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ही घट हजारांच्या संख्येने दिसून आली असली तरीही नाशिक आणि नागपूरातील रुग्णवाढ कायम दिसून येत आहे. त्याखालोखाल अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यांतील रुग्णवाढीबाबतही आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

(हेही वाचा – मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानच्या नावास विरोध; भाजप आणि बजरंग दल आक्रमक)

रुग्णसंख्या तीन लाखांहून कमी

डिस्चार्ज संख्या वाढल्याने बुधवारी कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत २ लाख ९८ हजार ७३३ वर नोंदवली गेली.
बुधवारी राज्यात ७९ रुग्णांनी जीव गमावला. मुंबईत १३, नाशकात १२, ठाण्यात, रागयडमध्ये प्रत्येकी ४, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत प्रत्येकी ३ , मीरा-भाईंदर, अहमदनगर, सोलापूर, सांगलीत, अकोला, यवतमाळ, भंडारा आणि पनवेलमध्ये प्रत्येकी १, जळगावात, पुण्यात, कोल्हापूरात, रत्नागिरीत, नादंडमध्ये आणि वर्ध्यात प्रत्येकी २, पिंपरी-चिंचवडमध्ये ६, साता-यात आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.